♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्मशानभूमीसाठी नगरसेवक दत्ता सुसर यांनी सुरू केलेल्या उपोषणाची खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते यशस्वी सांगता

  1. MH 28 News Live, चिखली : नगर पालिकेचे सदस्य दत्ता सुसर यांनी आपल्या विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी उपोषण याद्वारे गेल्या दोन दिवसांपासून लावून धरली होती. यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर त्यांनी दि. ८ मार्च रोजी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची यशस्वी सांगता दि. ९ मार्च रोजी खा. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये झाली. नगरपालिका प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंबंधीचे पत्र तहसीलदार येळे आणि खासदार जाधव यांच्या उपस्थितीत सुसर यांना दिले. खा. जाधव यांच्या हस्ते चहापान करून दत्ता सुसर यांनी आपले उपोषण सोडले.

शहरातील गजानन नगर, पुंडलिक नगर आणि दांडगे ले – आउट या परिसरातील नवीन वस्तीमधील नागरिकांना स्मशानभूमीच्या अभावी अत्यंत गैरसोय सहन करावी लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून येथे मृत्यू पावलेल्या नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. स्थानिक रहिवाशांना प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मलकापूर – सोलापूर महामार्ग ओलांडून शहरातील गोरक्षणवाडी स्मशानभूमी मध्ये यावे लागते. या महामार्ग मोठ्या वाहनांची सतत मोठी वर्दळ असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वर्तविली जाते. अश्या परिस्थितीत स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी येथे स्वतंत्र स्मशानभूमी असणे अतिशय गरजेचे आहे. या स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी बऱ्याच वर्षांपासून येथील नागरिक करत होते. ही मागणी शिवसेना नगरसेवक दत्ता सर यांनी उचलून धरली. या मागणीसाठी त्यांनी शैलेंद्र डोणगावकर यांच्या सोबत नगरपालिका कार्यालयासमोर दि. ८ मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले. दि. ९ मार्च रोजी या उपोषणाला खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट दिली. खासदार जाधव यांच्या उपस्थितीत तहसीलदार अजितकुमार येळे, नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीपाद भालेराव, मुख्य लिपिक अर्जुन इंगळे यांनी सर्वांनी चर्चा करून या समस्येतून मार्ग काढला. पुंडलिक नगर, गजानन नगर आणि दांडगे ले – आउट या परिसरातील खासगी जमीन अधिग्रहीत करून त्या ठिकाणी स्मशानभूमीची निर्मिती करण्यासंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे पत्र चिखली नगरपालिकेने दत्ता सुसर यांना सुपूर्द केले. खासदार प्रतापराव जाधव यांनी हे पत्र दत्ता दुसऱ्यांना सोपवले आणि खासदार जाधव यांच्या हस्ते चहापान करून सुसर व त्यांचे सहकारी यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली.

 

या प्रसंगी शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, भास्करराव मोरे, शहर प्रमुख श्रीराम झोरे,उपशहर प्रमुख दत्ता देशमुख, माजी नगरसेवक श्रीकांत टेहरे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, शिवाजीराव देशमुख, प्रशांत एकडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129