♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अ. भा. संघर्ष संघटनेच्या अभियानाला सुरुवात; घरोघरी वाटणार संविधानाची उद्देशिका

MH 28 News Live, चिखली : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संविधान उद्देशिका चिखली शहरा मध्ये घरोघरी वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ दि. २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.

जात ना धर्म मानवता हाच खरा धर्म समता ‘ एकता बंधुता प्रथम आणि अंततः भारतीय हा विचार देशातील नागरीकांना देत आज देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे. पूर्वी देशातील सामान्य माणसाला अधिकार नव्हते, महिलांना मान वर करून चालण्याची मुभा नव्हती. आज महिला सन्मानाने देशाची राष्ट्रपती व पंतप्रधान होत आहे. हे संविधान नसते तर महिलांचे जीवन चुल आणि मुल या पर्यंतच मर्यादित राहील असते. आपण जो मुक्त श्वास घेतो ही सुध्दा संविधानाची देन आहे. अशी जन जागृती करत संविधान उद्देशीकेचे महत्व काय आहे हे समजावून सांगण्यासाठी संविधान उद्देशिका घर घर पोहचवण्याचा प्रयत्न अ. भा. संघर्ष संघटनेतर्फे केला जात आहे असे प्रतिसाद संघटनेचे संस्थापक प्रशांत भटकर यांनी या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरीकास, सामाजिक, आर्थिक व राजनैतीक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास ,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत २६ नोव्हेंबर १९ ४९ रोजी याव्दारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अशी प्रस्तावना असलेली महान राज्य घटना अथक परिश्रम घेऊन देशाला बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत याची सर्वांनी जनजागृती ठेवणे जरूरीचे आहे असे ते म्हणाले.

सय्यद इम्रान उपाध्यक्ष , राम अवसरमोल सचिव ,नागेश म्हस्के सहसचिव, आकाश साळवे, गौतम सोनटक्के , आकाश बनसोड, नितीन जाधव, गौतम घेवंदे, रोहीत हाडे, सुशील जाधव, शेख जमशेद, शुभम जाधव, सुमित गवई, आतिष काळे, सुमित खंडारे , गजानन मघाडे आदींचे या उपक्रमाला सहकार्य लाभले. आणखी काही दिवस घर घर संविधान पोहचवण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे अशी माहिती भटकर यांनी या प्रसंगी दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129