
चिखली तालुका क्रीडा स्पर्धेत पळसखेड दौलतचे खेळाडू पोहोचले विभागस्तरावर
- MH 28 News Live, चिखली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे जिल्हा क्रीडाधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 डिसेंबर रोजी चिखली तालुक्याच्या शालेय मैदानी स्पर्धा शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडागणावर संपन्न झाल्या.
या शालेय मैदानी स्पर्धेमध्ये शिंगणे विद्यालय पळसखेड दौलतच्या 34 खेळाडूंनी विजयश्री खेचून आणत जिल्हास्तरावर पोहोचले.
जिल्हा क्रीडासंकुल बुलढाणा येथे 2 ते 4 ला शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 2 रोजी झालेल्या मुलींच्या स्पर्धेमध्ये (Players) साक्षी रगड लांब उडीमध्ये द्वितीय क्रमाकाने विजयी झाली तर सानिका नेवरे 400 मीटर धावणे द्वितीय, सारिका जाधव 800 मीटर धावणे द्वितीय, 400 मीटर हर्डल्स प्रथम तर उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक अश्विनी हिवाळे 400 मीटर हर्डल्स द्वितीय तसेच मुलींचा 4बाय 100 मीटर रिले व 4 बाय 400 मीटर रिले हे दोन्ही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले. या संघामध्ये नेहा खरे, साक्षी नेवरे, सानिका नेवले, रोहिणी फोलाने, सारिका जाधव, अश्विनी हिवाळे या खेळाडुंचा समावेश होता.
दि. 3 डिसेंबर रोजी झालेल्या मुलांच्या शालेय मैदानी स्पर्धेमध्ये निलेश गायकवाड लांब उडी तृतीय क्रमांकाने विजयी तर यश आराख उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, गणेश लहाने 800 मीटर धावणे द्वितीय , मुलांचा रिलेसंघ 4 बाय 100 मिटर प्रथम क्रमांकाने तर 4 बाय 400 मीटर रिले द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. या संघामध्ये निलेश गायकवाड, सिद्धेश्वर इंगळे, अजय कर्हाडे, राजू थिगळे, यश आराख, सुमित खरे या खेळाडूंचा समावेश आहे. विजयी खेळाडूंचे संस्थचे अध्यक्ष डॉ. पर्हाड व संचालक मंडळ, मुख्याध्यापक लाटे व शिक्षकवृंदानी यांनी कौतुक केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button