♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बांधकाम कामगारांना मिळणार आता डिबीटीद्वारे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ. कामगाराची कुणी फसवणूक केल्यास करा पोलीस स्टेशनला तक्रार

MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने ऑनलाईन खात्यात जमा करण्यात येतो.

 

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी स्वत:ची नोंदणी करण्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह त्यामध्ये छायाचित्रासह ओळखीचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, स्वयं घोषणापत्र, 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे बँकेचे पासबुकची छायांकित प्रत, आधार संमती पत्र आदींचा समावेश असावा. तसेच नुतनीकरणकरीता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा. याकरिता नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 1 रूपया प्रती माह प्रमाणे 12 रूपये एक वर्षाचे भरून पावती घ्यावी. या व्यरितिरिक्त कोणतेही शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांकरीतासुद्धा बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

 

लाभाचे अर्ज तपासणी नंतर लाभाची रक्कम बांधकाम कामागारांच्या खात्यात परस्पर डीबीटी पद्धतीने मंडळ स्तरावरून वर्ग करण्यात येते. त्रयस्थ व्यक्तीच्या मोहाला बळी पडू नये. कोणत्याही कामगाराची जर फसवणूक होत असेल, तर त्यांनी संबंधीतांविरूद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129