समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी वेळ मर्यादा ठरली, दोषींवर होणार कारवाई
MH 28 News Live : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. शिर्डी ते नागपूरपर्यंत हा महामार्ग खुला झाला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे मृद्धी हायवेवर स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. आता यापुढे स्पीड लिमिट मोडले तर तुमच्यावर कारवाई होणार आहे.
समृद्धी हायवेवर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा बसणार आहे. समृद्धी महामार्ग हा गाड्या दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील हे लक्षात ठेऊन बांधण्यात आला होता. पण महामार्ग सुरु झाल्यापासून अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही वेगमर्यादा आता ताशी 120 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
गाड्यांचा स्पीड लिमिट नियंत्रित राहण्यासाठी स्पीड गन लावण्यात येतील तसेच पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवली जाईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 70 हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं 11 डिसेंबर,2022 ला उद्घाटन झाले. या सोहळ्यानंतर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला.
नागपूर ते शिर्डी या 520 कि.मी. च्या टप्प्यात आतापर्यंत 70 हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक आणि चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुरेपूर काळजी घेतलेली आहे.
या महामार्गावर ताशी 150 किमी वेगाने वाहने चालवता येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता त्यावर बंधण घालण्यात आले आहे. आता ताशी 120 किमीच्या वेगाने गाडी चालवता येईल. त्यापुढे वेग वाढवता येणार नाही. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, या समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागणार आहे.
समृद्धी महामार्गाने वेगाने गाडी चालवताना टायरवर दाब येऊन टायर फुटून अपघात होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. ताशी 120 किमी वेगाने या मार्गावरुन प्रवास करु शकता, पण त्यासाठी मोठी रिस्क घ्यावी लागेल. वाहनाच्या टायरमध्ये साधी हवा भरल्यावर नॉनस्टॉप गाडी चालवल्यास टायरमधील हवा प्रसरण पावून टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे नायट्रोजन भरावं, असा सल्ला देण्यात आला आहे. टायरची साईडवॉलही चेक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button