काँग्रसचे भास्करराव आडळकर यांचा भाजपात प्रवेश
MH 28 News Live, चिखली : भास्करराव आडळकर यांनी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानिमित्त त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.
आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्या दरम्यान काँग्रेसचे नेते भास्करराव आढळकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
भास्करराव आडळकर यांनी करवंड युवक काँग्रेस अध्यक्षपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे सर्कल प्रमुख, चिखली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस सरसिटणीस, करवंड गावचे दोन वेळा सरपंच, जिल्हा परिषद शाळा समिती, सभापती कुणबी युवा मंच अध्यक्ष अशी अनेक पद भूषवीत आहेत. भास्करराव आडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये काल जाहीर प्रवेश केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button