महावितरण कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
MH 28 News Live, जळगाव जामोद : येथून जवळच असलेल्यात असलेल्या वाडी खुर्द रामनगर येथे राहणारे मनोहर मुरलीधर भोपळे वय 40 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात लहान बाळाला केलेल्या पाळण्याचा दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असुन या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
मृतक मनोहर भोपळे हे जळगाव जामोद येथील महावितरण केंद्रामध्ये लाईनमन होते. मृतक मनोहर भोपळे यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ रामदास ज्ञानदेव भोपळे व मृतकाचा साळा राम प्रल्हाद इंगळे यांनी मृतक वायरमन मनोहर भोपळे यांना पेट्रोल पंप येथील डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टर प्रशांत पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले सदर घटनेची फिर्याद मृतकाचा चुलत भाऊ रामदास यांनी भोपळे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी दवाखान्यात धाव घेऊन पंचनामा केला व मृतक मनोहर भोपळे यांचा मृतदेह शवविच्छेदन क्रियेसाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला त्यांच्यावर आज दिनांक 28 डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.. मृतक मनोहर भोपळे हे शांत संयमी व जळगाव शहरांमध्ये सर्व परिचित होते. त्यांच्या आत्महत्येने जळगाव जामोद शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button