कोट्यावधी रुपये खर्चूनही डोणगांववासी तहानलेलेच
MH 28 News Live, डोणगांव : डोणगांव हे गाव राज्य जवळ पास 35 हजार लोकसंख्या असणारे गाव असून येथे 2014 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली होती. त्यावर करोडो रुपये खर्च होऊनही आज देखील डोणगांववासी तहानलेलेच असल्याने सदर योजनेची चौकशी करावी अशी चर्चा होत आहे.
डोणगांव येथे 2014 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. त्यानंतर सदर योजनेवर करोडो रुपये खर्च झाला परंतु सदर योजनेतून आजपर्यंत पाणी मिळाले नाही याबाबत अनेक राजकीय पक्ष तसेच गावकरी यांनी तक्रार करुनही नळाला शुध्द पाणी मिळाले नाही. एवढेच नव्हे तर सदर योजना चालू करुन यामधील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपोषण केले तर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी शासकीय नळ योजना भ्रष्टाचार विरोधी निर्मुलन समिती स्थापन करुन सदर भ्रष्टाचार विषयी आंदोलन केले. मात्र नंतर कोठे पाणी मुरले हे जनतेला न कळल्याने आजही डोणगांव येथील नळयोजना पाण्याविनाच आहे तर पाणी न येऊनही सदर योजनेवर पुन्हा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने या योजनेतून डोणगांववासियांची तहान भागवणार की पुन्हा तहानलेलेच रहावे लागेल याकडे लक्ष लागले आहे. सदर योजनेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पुढे येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे तरच डोणगांव वासीयांना या पेयजल योजनेतून पाणी मिळेल अशा प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button