
प्रथमच जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासकडून सुटी जाहीर
MH 28 News Live, बुलढाणा : राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा प्रशासनाने उद्या १२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या ठिकाणी लाखो शिवभक्तांचा मेळा भरतो. तर राजवाड्यावर माँ जिजाऊंच्या दर्शनासाठी जनसागर उसळत असतो.
जिजाऊ जयंतीनिमित्त सुटी घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या मागणीला योग्य न्याय देण्याचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर एचपी तुम्मोड यांना मिळाला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच स्थानिक सुट्ट्यांच्या यादीमध्ये जिजाऊ जयंतीला समाविष्ट करण्यात आले आहे. जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता यावा, हाच उद्देश या सुट्टी मागचा आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यातील तीन सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदाच माँ जिजाऊ जयंतीचा समावेश करून जिजाऊ भक्तांना आनंदाची भेट दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांचेही महत्त्वपूर्ण योगदान सदर निर्णयामध्ये राहिले आहे. इतर दोन सुट्ट्यांमध्ये ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आणि २२ सप्टेंबर रोजी गौरी पूजनाची सुटी राहणार आहे. सुट्टी बाबतचा सदर आदेश थोड्याच वेळापूर्वी जारी करण्यात आला आहे.