♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मनसेच्या वतीने चिखलीत महाप्रसादाचे वाटप

MH 28 News Live, चिखली : जगातील आदर्श मातृत्वाचा अखंड ऊर्जा स्त्रोत माँ साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त दि. १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मेहकर फाटा चिखली येथे माँ साहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे माँ साहेबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना चहा व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात तनवी संदीप नरवाडे हिने उत्कृष्ट असे गीत गायन केले. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मन शेतकरी सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, जिल्हा सचिव डॉ. योगेश काळे, मन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मन शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, तालुका सचिव प्रवीण देशमुख,राणा गजानन सोळंकी, उपशहराध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, मन वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष नारायण देशमुख, मनवि सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष छाया परिहार, रुक्मिणी सपकाळ,विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के मंगेश उगले, निशांत गायकवाड, दिनकर खरपास, पंढरी महिंद, राजेंद्र गायकवाड, एकनाथ तांगडे, संजय दळवी, अमोल वानखेडे, किशोर लोखंडे,गणेश मानतकर, ज्ञानेश्वर हाडे, सुनील ठेंग, मयूर पऱ्हाड यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129