अकोला नायगावचा अट्टल घरफोड्या गुन्हेगार रशीद शहा उर्फ तलवारसिंग बुलढाणा शहर पोलीसांनी केला जेरबंद
MH 28 News Live, धामणगाव बढे : बुलढाणा येथिल समता नगरमध्ये दिवसा घरफोडीतील १ लाख ७ हजाराचे सोन्या चांदीच्या दागीन्यासह रोख रक्कम घेवुन पसार झालेला अट्टल घरफोड्या अकोला नायगावचा गुन्हेगार रशीद शहा उर्फ तलवारसिंग बुलढाणा शहर पोलीसांनी अमरावती येथून ताब्यात घेतला.
बुलढाणा येथिल समता नगर मधील रहीवासी सो. पूजा उमेश सपकाळ वय २८ वर्ष ही दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजे सुमारास भारत विद्यालय येथे सफाईचे कामा करीता गेले असता कामावरुन घरी परतल्यावर त्यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यावरुन त्यांनी घरात जावुन पाहीले असता घरातील बेडरुम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले कानातील सोन्याचे झुमके, पेंडाॕल, सोन्याची अंगठी, गहुमणी, गोलमणी असे एकुण २२ ग्रॕम सोन्याचे दागिने किंमत ७० हजार रु.चांदीची ४ तोळे वजनाची चैन किंमत २ हजार रु. १ हॕन्ड्राईड मोबाईल किंमत ४ हजार रु. व रोख रक्कम ३१ हजार रु. आसा एकुण १ लाख ७ हजाराचा मुद्दे माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले वरुन बुलढाणा शहर पो.स्टे ला झालेल्या प्रकाराची अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद दी.१८/४/२०२२ रोजी सौ.पुजा उमेश सपकाळ वय वर्ष २८ रा.बुलढाणा समता नगर यांनी दीले वरुन बुलढाणा शहर पोलीसांनी अप.क्रं २७९/२०२२ कलम ३८०,४५४, भादविप्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास कामी शहर पो.स्टे चे सपोउपनि माधव पेटकर यांचेकडे देण्यात आला.
सदर घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांचे आदेशान्वये सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान डि. बी. पथकातील पोलीसांना खब-या कडुन विश्वासनीय माहीती मिळाली की सदर घरफोडी ही अकोला येथिल रशीद शहा उर्फ तलवारसिंग या आरोपीने केली आहे. बुलढाणा शहर डि.बी.पथक पोलीसांचे तपासचक्र उर्फ तलवारसिंगच्या दीशेने धावु लागल्याने नमुद आरोपी वर या पुर्वी सुध्दा घरफोडीचे गुन्हे दाखल असुन सदर आरोपी सध्या अमरावती येथिल घरफोडीच्या गुन्ह्यात पो. स्टे. राजापेठ अंतर्गत मध्यवर्ती कारागृह अमरावती जेलमध्ये असल्याची खात्री लायक माहीती मिळाली, सदर आरोपी रशीद शहा उर्फ तलवारसिंग हमिदशहा वय ४८ वर्ष रा. महेबुकीया मशीद जवळ नायगाव अकोला यास अमरावती येथुन ताब्यात घेवुन बुलढाणा येथिल शहर पो.स्टेला दाखल गुन्ह्यात अटक केली. या दरम्यान गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता आरोपीने सदर गुन्ह्यातील मुद्दे माल हा धाड येथिल एका सराफा व्यवसायीकाला दवाखान्याचे काम असल्याने माझ्या पत्नीचे दागीने असल्याचे सांगुन विकले होते, सदरचा मुद्दे माल एकुण ८९,७४० रु.चा मुद्दे माल बुलढाणा शहर डि.बी.पथक यांनी हस्तगत केला.
सदर गुन्ह्याचा तपास व कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड,अप्पर पो.अधिक्षक बि. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन कदम यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन
बुलढाणा शहर पो.स्टे चे पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर,यांचे सुचनेवरुन बुलढाणा शहर पो.स्टे चे डि.बी.प्रमुख पोउपनी सखाराम सोनुने, सहा. फौजदार माधव पेटकर, पो. हे. काॕ. प्रभाकर लोखंडे, सुनिल जाधव, महादेव इंगळे, नापोकाॕ.सुनिल मोझे, गंगेश्वर पिंपळे, गजानन जाधव, पो. काॕ. युवराज शिंदे,विनोद बोरे, शिवहरी सांगळे, महीला पो. काॕ सुनिता खंडारे, वाहन चालक ए. एस. आय. उमाले यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्हा उघकीस आणण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा.फौजदार माधव पेटकर यांनी वेळोवेळी आरोपीच्या अकोला व अमरावती कडील माहीतीवर लक्ष ठेवुन असल्याने सदर गुन्हा उघडकीस आला असुन सराईत अट्टल घरफोड्या गुन्हेगार रशीद शहा उर्फ तलवारसिंग अखेर बुलढाणा शहर डि.बी.पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button