♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रशांत पाटील ISIA 2022 इंडिया सोशल इम्पॅक्ट पुरस्कार जाहीर

MH 28 News Live, चिखली : रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांना ISIA 2022 सोशल इम्पॅक्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक दर्जाच्या प्रसारमाध्यमांपैकी अग्रगण्य अश्या हिंदुस्थान मेट्रो, इंडिया फ्लक्स, प्रविझर्ड न्यूज, द डेली बिट, न्युजहंटमध्ये इंडिया सोशल ईम्पॅक्ट अवार्ड्स २०२२ ची नामांकन यादी प्रदर्शित झालेली आहे.

जयपूर येथील हायपेज मीडियाद्वारा देशातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व चेंजमेकर्स कामगिरी करणाऱ्या समाजातील बहिष्कृत लोकांची सेवा करणारे निस्वार्थी मदतकरणाऱ्या, सामान्य माणसाच्या पर्यंत लाभ पोहचवण्यासाठी असामान्य काम करणाऱ्या परोपकारी, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक योगदान असलेल्यांचा सन्मान देशभरातील ७८ सामाजिक कार्यकर्त्यांना ISIA 2022 इंडिया सोशल इम्पॅक्ट अवार्ड्सने सन्मानित करण्यात येत आहे. यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील प्रशांत ढोरे पाटील यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, प्रशांत पाटील यांचं सामाजिक कार्यात अमूल्य असे योगदान आहे विशेष म्हणजे त्यांनी कोरोना काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता परराज्यातील कोरोणामुळे मृत रुघ्नांच्या दफनविधीसह कोरोना रुग्णांसाठी केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांची सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांना २०२२ चा इंडिया सोशल इम्पॅक्ट पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रशांत पाटील यांनी विध्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची सुरवात केली. खऱ्या अर्थाने त्यांनी २००८ -०९ ला मराठा युवा मंचाच्याद्वारे सामाजिक कार्याची सुरुवात केली त्यांनी मराठा समाजातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य हाती घेतले त्यांनतर त्यांनी कुठल्या एका समाजापुरते मर्यादित न राहता जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून सर्व समावेशक समाजातील घटकांसाठी काम केलं त्याच बरोबर त्यांनी चिखली केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून व्यवसायिकांसाठी देखील काम केलं त्यानंतर त्यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सोबत रयत क्रांती संघटनेच्या पायाभरणी पासून सोबत असून त्यांना संघटनेच्या राज्य कोअर कमेटीत स्थान देण्यात आले. २०१७ पासून संघटनेत विदर्भाध्यक्ष म्हणून काम करत असतांना त्यांना थोड्या दिवसातच राज्य प्रवक्ता म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. याच बरोबर ते क्षत्रिय मराठा ऑर्गनायझेशनद्वारे मराठा समाजासाठी देखील काम करत आहेत,देशभरातून हाइपेज मीडियाद्वारे इंडिया सोशल इम्पैक्ट अवार्ड्स २०२२ ने सन्मानित करण्यात येत आहे.

यामध्ये देशविदेशातील सामाजिक कार्यकर्ते अजय सहाय, प्रशांत ढोरे पाटील, गजेंद्र रेड्डी ए, डॉ कृष्ण सिंह आर्य, डॉ प्रशांत सोपानराव तेलगड, शिव अरोड़ा, योगेश रामचंद्र पठारे, गिफ्टसन जोस, डॉ सायंतनी भट्टाचार्जी, बिलाल अहमद भट, विवेक नाथवानी, तनुज अग्रवाल, एल्विस लालथांगजुआला, दिवेश नरेश पास्ते, डॉ मोहम्मद रफीउद्दीन नैय्यर, डॉ. शिवप्पा डी, डॉ रंजन यादव, प्रो. (डॉ.) राकेश कुमार वर्मा, रॉबर्ट येसुदीप संधू, नौपद सत्यनारायण आदींना ISIA 2022 इंडिया सोशल इम्पॅक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129