♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्हाधिकाऱ्यांचे नावे पाठवला. बनावट संदेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल. नागरिकांना सावधगिरीचे आवाहन

MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना बनावट संदेश पाठविणाऱ्या विरूद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी, दि. १९ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करीत असून तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे.

मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. श्री. राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रशिक्षणास आले होते. दरम्यान त्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास 8330007295 या क्रमांकावरून एक संदेश आला. या संदेशाला उत्तर देताना आपण कोण आहात अशी विचारणा केल्यानंतर आपण जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, आयएएस अशा आशयाचा संदेश पाठविला. राठोड यांना याबाबत साशंकता वाटल्याने त्यांनी सदर व्हॉटस् ॲपची तपासणी केली असता सदर क्रमांकावर एच. पी. तुम्मोड, आयएएस आणि डीपी ठेवलेला असल्याचे आढळून आले. सदरील मोबाईलधारक व्यक्ती हा बनावट असू शकत असल्याने राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर लेखी तक्रार नोंदवावी. आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष भेटून निवेदन द्यावे. सबब जिल्हाधिकारी यांच्या नावे येणाऱ्या व्हॉटस् ॲपवरील बनावट संदेशाला कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129