विभागस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आदर्श विद्यालयातील १३ खेळाडूंचे यश
MH 28 News Live, चिखली : विभागस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आदर्श विद्यालयातील १३ खेळाडूंनी यश संपादन केले. या सर्व १३ खेळाडूंची दिनांक ३१ जानेवारी ते ३फेब्रुवारी २०२३ पर्यंत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व खेळाडूंचे क्रीडा अधिकारी इंगळे साहेब तसेच धारपवार यांनी सर्व यश संपादन केलेल्या खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळाचे चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर, सचिव प्रेमराज भाला, सहसचिव कैलास शेटे व सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंना व क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहे तसेच पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड झाली. साहिल देशमाने १०वा (ई), प्रसाद सोळंकी ९ वा (ग), नकुल लोढे १० वा (फ), युवराज ठेंग ९ वा (फ), कु.सावरी नागरे १० वा (ड), कु.सृष्टी म्हस्के १० वा (फ), कु.भक्ती सोळंकी ९ वा (ग), कु. खुशी रिंढे ८वा(ग ), कु. सई देशमुख ८वा (फ), कु. तेजस्विनी मोरे. अयानखान कलीमखान ८ वा (क), संकेत अंभोरे ८ वा (फ), सोहम देशमुख ७ वा (ग) या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली असुन यांना क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षक संतोष गुळवे, होमराज कोळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button