
दिव्यांग विद्यार्थ्यांनो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा !
MH 28 News Live, बुलडाणा : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पिपल संस्थेकडून बजाज फिनसर्व स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्टुडंट विथ डिसेबिलीटी ही शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी दि. ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी bspf.ncpedp@gmail.com किंवा secretatiat.ncpedp@gmail.com या मेल आयडीवर पीडीएफ किंवा वर्ड फाईलमध्ये विहित नमुन्यात अर्ज करावे लागणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.