चांदुर बिस्वा येथे कृषी विभाग महसूल विभागाकडून तूर पिकाचा सर्वे
MH 28 News Live, चांदुर बिस्वा : येथे कृषी विभाग महसूल विभागाकडून दि. २४ जानेवारी रोजी शेतकऱ्यांसाठी तूर पिकाचा सर्वे करण्यात आला.
चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये तुर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तुर पिकाचे नुकसान ७० % झाले आहे तुर पिकाचे सर्वे करण्याकरिता अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले होते व शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभाग व महसूल विभागाकडे केले होते निवेदन व अर्जाची दखल घेऊन चांदूर बिस्वा येथे तुर पिकाचा सर्वे २४ जानेवारी रोजी महसूल विभाग व कृषी विभागाने तूर पिकाचा सर्वे करण्यात आला यावेळी तलाठी उके साहेब, कृषीसेवक अमोल भिडे साहेब, यांनी सर्वे केला यावेळी अभय संतोषराव पाटील व शेतकरी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button