” काकाने दिला नात्यात धोका ” अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
MH 28 News Live, चिखली : चिखलीच्या गजानन नगरात राहतात एका १५ वर्षीय मुलीसोबत प्रकारचं तेवढा धक्कादायक घडलाय. मुलीच्या मावशीच्या नवऱ्याची विकृत नजर तिच्यावर पडली. आणि त्याने तिच्यासोबत नको तेच केलं. अखेर पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.. पोलिसांनीही तातडीने तपासाला गती देत आरोपी काकाला बीड जिल्ह्यातल्या गेवराई येथून ताब्यात घेत अटक केली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की येथील गजानन नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारिरीक संबंध ठेवणार्या आरोपी विरुद्ध पिडीत मुलीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून सदर आरोपी हा मुलीचा दूरचा काका लागतो. दरम्यान चिखली पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू करून आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केले असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार १ सप्टेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी हा नात्याने मुलीचा मावसा म्हणजेच काका असल्याने त्या ओळखीचा गैरफायदा आरोपीने घेतला. ओळखीतून जवळीक वाढवून तो अनेकदा मुलीला भेटायला चिखलीत मुलीच्या घरी यायचा, मात्र नातेवाईक असल्याने कुणाला संशय आला नाही. या गोष्टीचा फायदा घेत आरोपीने एक दिवस तिला मोटारसायकल वर बसवून बुलडाण्यात नेले. तिथे एका लॉजवर तिला नेऊनि तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझी बदनामी करेन अशी धमकी त्याने मुलीला दिली. पिडीतेने हा प्रकार इतरांना सांगितला नाही. २३ जानेवारीच्या संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी काका मुलीच्या शाळेसमोर आला. त्याने मुलीला गाडीवर बसवून बाजूला नेत ओढणी काढून मुलीला जवळ ओढले असेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे. अखेर घडला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार, पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांनी तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक धनजंय इंगळे यांच्या हाती देत वेगवान तपासाच्या सूचना दिल्या. काल, २६ जानेवारी रोजी आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली. आज, २७ जानेवारीला आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button