♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विद्यार्थ्यांनी मेहनती बरोबर सातत्य ठेवावे – आ. श्वेताताई महाले पाटील परिक्षा पे चर्चा कार्यक्रमांत एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

MH 28 News Live, चिखली : कोणतेही काम असू द्या त्या कामाचे व वेळेचे नियोजन, नियोजन आणि कामाच्या टाईम टेबल नुसार काम करणे ही त्या कामाची योग्य पध्दत आहे. कोणत्याही कामासाठी जेव्हढे कठोर परिश्रम, मेहनत घ्याल तितके यश उत्तूंग असते आणि जो कष्ट घेईल तो यशस्वी होईल . परंतु त्यासाठी सुद्धा मेहनत आणि कष्टाला सातत्याची जोड असल्याशिवाय चांगले यश मिळत नाही .ज्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला सातत्याची जोड आहे त्याला उत्तुंग यशापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रम झाल्यावर एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सर्व शाळांमधून राबविण्यात आला. चिखली विधान सभा मतदार संघातील प्रत्येक शाळेत सुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला. आदर्श विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात आ. श्वेताताई महाले स्वतः सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सर्वोत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातील एक भाग म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात दि २१ जानेवारी रोजी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतदार संघातील २४ शाळांनी सहभाग घेऊन जवळपास सहा हजार आठशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले होते. त्यातील प्रत्येक शाळेतून सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना अनुक्रमे ३१००, २१०० व ११०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सोबत प्रत्येक सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.

आजची पिढी डिजिटल गुलाम झालेली आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट कम्प्युटर या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडलेले जरी असलो तरी मनाने आणि शरीराने एकमेकांपासून खूप दूर जात आहोत डिजिटल गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी किमान एक दिवसाचा डिजिटल फास्ट म्हणजेच डिजिटल उपवास करण्याचा मुलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ परिक्षा पे चर्चा ‘ या कार्यक्रमात दिला असल्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रत्येकाने अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा असे सुद्धा आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.

भारताची भावी पिढी आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम व्हावी म्हणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था चिखली येथील आदर्श विद्यालयात करून विद्यार्थ्यांसह आ. श्वेताताई महाले आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आज आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते शिवाजी विद्यालय व आदर्श कॉन्व्हेन्टसह इतर ठिकाणी सुद्धा बक्षीस वितरण करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129