♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

युवकांनी कबड्डी खेळाकडे वळावे – ऋषिकेश म्हस्के

MH 28 News Live, चिखली : कबड्डी हा ग्रामीण भागातील लोकप्रिय मैदानी खेळ आहे. प्रो – कबड्डी लीग स्पर्धेमुळे कबड्डीला वलय प्राप्त झाले आहे. प्रो- कबड्डी लिगमुळे अनेक कुशल, अष्टपैलू खेळाडूंनी प्रगती साधली आहे. अनेकांनी शासकीय नोकरीत स्थान मिळविले आहे. युवा खेळाडूंनी कबड्डी खेळाकडे वळावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषीकेश म्हस्के पाटील यांनी केले.

तालुक्यातील आमखेड येथे राष्ट्रमाता जिजाऊ कबड्डी संघ, पंचशील नवयुवक संघ, जगदंब प्रतिष्ठान मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्यावतीने ४ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन आमखेड येथील माजी सैनिक जगन्नाथ वाघ यांच्या हस्ते झाले.
एकलारा येथील ग्रा. पं. सदस्य बंडूभाऊ अंभोरे, माजी सैनिक रवींद्र वाघ, ग्रा. पं. सदस्य भागवत वाघ, शाळा समिती अध्यक्ष गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कबड्डी किटचे अनावरण ऋषिकेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम पारितोषिक शंभूराजे कबड्डी संघ प्रिंपरी, द्वितीय पारितोषिक जय बजरंग कबड्डी संघ कल्याणा,
तृतीय पारितोषिक जय बजरंग कबड्डी संघ अंचळ, चतुर्थ पारितोषिक माऊली कबड्डी संघ उदनापूर, पाचवे पारितोषिक आमखेड येथील राष्ट्रमाता जिजाऊ कबड्डी संघाने पटकावले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. समालोचन नारायण वाघ, चंदन शिंदे, संतोष वाघ यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राम भाकडे, पवन वाघ, अजय डुकरे, अंकुश वाघ, ऋषभ वाघ, दत्ता भाकडे, दत्ता वाघ, पवन नाटेकर, अंकुश वाघ, गोपाल वाघ, पवन गवई, शुभम डुकरे, ओम वाघ, ओम जे. वाघ नागेश भाकडे, संकेत भाकडे, दत्ता अ.वाघ, तेजस वाघ, निखील वाघ, सुमीत वाघ आदींनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129