♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

२० वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या; धामणगाव बढेमध्ये एका आठवड्यात तिसरी आत्महत्या

MH 28 News Live, मोताळा : तालुक्यातील थामणगाव बडे येथे आत्महत्येचे सत्र सुरु असून आठवड्याभरात तीन जणांनी आत्महत्या केल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. बुधवार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. युवकाचे नाव दिपक पांडुरंग सुरडकर असे आहे.

धामणगाव बढे येथील वार्ड क्रमांक ४ मधील दिपक सुरडकर ( वय २०) याने ८ फेब्रुवारीच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. तरुणाची आई बाहेरुन आली असता, त्यांना मुलगा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी हंबरडा फोडीत आरडोओरड करुन शेजारी व नातेवाईकांना बोलाविले. यावेळी नागरिकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केली. याबाबत मृतक दिपकचे मावसे संजय काकफळे रा. खंडवा यांच्या फिर्यादीवरुन धा बढे पोस्टे. ला मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धा बढे पोलिस करीत आहे. दीपकने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129