शिव जयंतीनिमित्त चिखलीत शिव कालीन शस्त्र प्रदर्शन. अवतरणार शिवकालीन शस्त्रे
MH 28 News Live, चिखली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चिखली शहरात आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या शस्त्र प्रदर्शना मुळे चिखलीत दि. १७ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत शिव कालीन युध्दातील काळ अवतरणार आहे.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
ज्यांनी ज्यांनी शिवकाळात जन्म घेतला ते खरचं धन्य म्हणावे लागेल. त्यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांचे रुप आणि प्रताप त्याची डोळा त्याची देही अनुभवला असेल, आपण अभागी आपल्याला त्यांचे रूप आणि प्रताप ही पहाता आला नाही. आपण केवळ त्यांचे रुप कल्पनेत अनुभवतो आणि प्रताप शब्द रूपाने वाचतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या वेळच्या आपल्याला प्रत्यक्षात जरी अनुभवता आले नसले तरी
ज्या शूरवीर योध्यांनी , मावळे यांनी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या लढाईत जीवावर उदार होऊन सहभागी झालेले होते त्यांच्या मनगटांनी शौर्याचे अनेक इतिहास लिहिले आहे.
मुघल, निजाम, इंग्रज व पोर्तुगीज या सोबतच जे जे आप्त असेल किंवा परकीय शत्रू असतील त्यांच्याशी लढण्यासाठी त्यावेळच्या मावळ्यांच्या पोलादी हातासोबतच त्यांनी हातात घेतलेल्या शस्त्रास्त्रांनी सुद्धा स्वराज्याच्या लढाया लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचे वैभव असणाऱ्या गड किल्ल्यात तसेच प्रत्यक्ष रणांगणात शत्रूंशी लढतांना पात्याला पाते भिडून ज्या तलवारी खणखणल्या, ज्या ढालींनी आणि चीलखतांनी स्वतःवर शत्रूंचे वार झेलून मर्द मराठा सेनापती, योध्ये आणि मावळ्यांचा जीव वाचवला , तोफांच्या गडगडाटांनी आसमंत दुमदुमून टाकला, ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, अशी शिवकालीन शस्त्रास्त्रे आजही जिवंत आहेत. त्यावेळच्या शौर्याचा, गनिमी काव्याचा, इतिहास मोठ्या अभिमानाने सांगत आहे. त्या इतिहासाचे अबोल साक्षिदार असणाऱ्या ज्या शस्त्रांनी स्वराज्याचे रक्षण केले, शत्रूला पळता भूई थोडी केली.
इतिहास अभ्यासक पंकज दुसाने यांच्याकडील शस्त्रे येणार
ठाण्याचे पंकज रविंद्र दुसाने विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी, (झाडीकर सराफ) हे प्रसिद्ध शस्त्र संग्राहक व अभ्यासक असून यांच्या संग्रहातील दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आजपर्यंत महाराष्ट्रासह अनेक परदेशातही आयोजन केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button