
गजानन महाराजांमुळे खडका गाव उजेडात आले – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, मेरा बु।। : श्री संत गजानन महाराज यांच्यामुळे खडका हे गाव उजेडात आले. हजारो भाविक या ठिकाणी कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेतात असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले.
येथून ३ कि. मी. अंतरावर दक्षिणेकडे खडका या उजाड गावी १४ वर्षांपासून श्री सुधीर पडघान पाटील यांचे शेतात ‘श्री’ चे मंदिर असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रगटदिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी श्रींचे आशीर्वाद घेऊन महाप्रसाद वितरण केला याप्रसंगी त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्यामुळे खडका हे गाव उजेडात आले. हजारो भाविक या ठिकाणी कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेतात, याही वर्षी सालाबादाप्रमाणे दि १२ फेब्रुवारी रोजी श्री गजानन विजय ग्रंथ पारायण संपन्न झाले, पारायणासाठी शेकडो वाचक बसले होते. काल्याचे कीर्तन ह. भ. प. बाळू महाराज राणीउचेगवकर यांनी केले.
या प्रगटदिन व महाप्रसादासाठी आ. श्वेताताई महाले, ऋषी जाधव, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार शशीकांत खेडेकर, विष्णू पाटील कुलसुंदर, सचिन बोंद्रे, प्रमोद पाटील, श्याम वाकदकर, कृष्णकुमार सपकाळ, ऋषभ पाटील, गणेश धुंदळे मनोज कायंदे, राजेंद्र पाटील व मेरा बु।। मनुबाई, व परिसरातील हजारो महिला पुरुष उपस्थित होते.