♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. गायकवाड पुन्हा बरसले; उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

MH 28 News Live, बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट कायमच आमने-सामने येत असल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणारे आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. बाळासाहेब हे विश्ववंदनीय महापुरुष असून ते काही कोणाची खासगी मालमत्ता नाही असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले गायकवाड ?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
आपण आपल्या वडिलांसाठी काय केलं ? आणि आमच्यासारख्या लोकांनी किती रक्त सांडलं हे पहावं. आमच्या सारखे मावळे सोबत होते म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहोचले. बाळासाहेब हे महापुरुष आहेत. त्यामुळे महापुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचा हक्क आहे. असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे. आता संजय गायकवाड यांच्या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129