♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

साखरखेर्ड्याजवळ भरधाव टिप्परखाली चिरडून शेंदूरजनच्या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू; पळून गेलेल्या चालकाला केली पोलिसांनी अटक.

MH 28 News Live, साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या अंबेवाडी फाट्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एक जण घटनास्थळीच मरण पावला तर तर दुसऱ्याचा वैद्यकीय अपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त टिप्परचा चालक या घटनेनंतर तेथून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अंबेवाडी फाट्याजवळून जात असताना भरधाव टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी १२९९ ने दुचाकीस्वार अमोल शिवाजी खोडके (वय २६) व ओम गैभी खोडके (वय २४) रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा यांना जोराची धडक देऊन उडविले. या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला. अपघातग्रस्त युवकांना ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. तसेच, साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार काळे व कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अमोल हा जागीच ठार झाला होता. तर दुसर्‍या युवकास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, नंतर त्याचीदेखील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. पळून गेलेला आरोपी हा साखरखेर्डा पोलिस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करत आहेत. या दुर्देवी घटनेने शेंदूरजन गावावर शोककळा पसरली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129