धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
MH 28 News Live, बुलडाणा : वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम याजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावी आणि त्यानंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न थेट बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसणे आवश्यक आहे.
तसेच बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे अवाश्यक. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. बारावी आणि नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबधित अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामाध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विजाभज, इमाव आणि विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटीमध्ये अर्ज केला आहे आणि सदर अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे अनिवार्य राहील, त्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुकत, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेच्या लाभास पात्र असतील. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button