
बुलडाणा जिल्ह्यात १८४ किलोमीटर रस्त्यांचा होणार विकास. चिखली, बुलढाणा व मेहकर तालुक्यातील या गावांना होणार फायदा
MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा व मेहकर तालुक्यांतील प्रमुख जिल्ह्यांबाबत हा निर्णय झाला असून, १८४ किलोमीटरचा विकास केला जाणार आहे. आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव ग. सं. कचरे यांनी काढला आहे.
अमरावती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा, मेहकर तालुक्यातील जिल्हा रस्त्यांना राज्य मार्गांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या रस्त्यावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यावर होणारा वापर याचा विचार करून सदर रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.
यानुसार गिरोला, सवना, दिवठाणा, बोरगाव वसू, खंडाळा मकरध्वज ते भालगाव, रोहडा, मेरा बुद्रुक हा २७ किलोमीटरचा जिल्हा रस्ता राज्य मार्ग होणार आहे. दरम्यान, काटोला, रान अंत्री, हिवरखेड, आमखेड, एकलारा, करतवाडी, टाकरखेड, करवंट, श्रीकृष्ण नगर हा २५ किलोमीटरचा रस्ता, उदयनगर, तोरणवाडा, आसोलानाईक, किनीनाईक, वडाळी, मांडवा, पारखेड फाटा, पार्डी फाटा, घाटपुरी ते टेंभुर्केड असा ४० किलोमीटरचा रस्ता आहे तर कोलारी, किन्होळा, सवणा, हातणी, वळती, सोमठाणा, देवठाणा, पेठ, अन्वी, शेलगाव जहागीर, मुंगसरी, खैरव, गांगलगाव, रोहडा ते रमणा ५१ किलोमीटरचा रस्ता, रमणा ते मढ, घुम्मी, तराळखेड, मासरूळ, धामणगाव, टाकळी, कुंबेफळ, कुलमखेड, मोंढाळा, मसला बुद्रूक, बोधेगाव, चांडोळ, भडगाव हा ४३ किलोमीटर रस्ता असे १८४.४०० किमीचे जिल्हा मार्ग असणारे रस्ते राज्य मार्ग म्हणून परिवर्तित केले जाणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button