
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी रुपाली सरोदे यांची पदभार स्वीकारला
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदी स्कॉड्रन लीडर (सेवानिवृत्त) रुपाली पांडुरंग सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती सरोदे ह्या माजी सैनिक पांडुरंग सरोदे यांची मुलगी आहे. यानिमित्त शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना श्रीमती सरोदे यांनी जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीर पत्नी आणि वीर मातांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, संजय गायकवाड, अर्जुन गाडेकर यांच्यासह अशोक शेळके उपस्थित होते शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, रमेश जोहरे, गजानन मोतेकर, उज्ज्वला कुलकर्णी, हरीदास थोलबरे, सांडू भगत, जी. व्ही. बढे, सुरेश खडके, आर. जे. जाधव, उत्तम रिंढे, गजानन पांगारकर, अनिरुद्ध खानझोडे, जयंत शेलेकर, मुरलीधर सुसर आदी उपस्थित होते.