♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांचे नेतृत्वात संजय पैठणकर व संतोष शिंदे यांचा पक्षप्रवेश

MH 28 News Live, चिखली : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे विचारच जनसामान्यांना न्याय देऊ शकतात असा विश्वास वाटत असल्याने चिखली शहर व परिसरातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मागील काही दिवसांपासून कल वाढला आहे. दि. २५ डिसेंबर रोजी राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात चिखली शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय पैठणकर व संतोष शिंदे यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेतला.

या प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व राज ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कायम तत्पर राहावे असे आवाहन केले.

त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरं पास मन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, संजय दळवी यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129