पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; अखेर मास्टर माईंड सापडलाच, SIT पथकाची कारवाई
MH 28 News Live : बारावी पेपरफुटी प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने SIT ची स्थापना केली होती. या प्रकरणात दोन शिक्षकांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. याच एसआयटी चौकशीत अकील मुनाफच आरोपी असल्याचं निश्चित झालं आहे. अकील मुनाफ याने बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधी आपल्या मोबाईल केमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठविल्याचं तपासात समोर आलं आहे.
याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची, माहितीही समोर आली होती. दरम्यान, बुलढाणा पेपरफुटी प्रकरणात आठ पैकी तीन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित पाच आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहचले आहे ? याचा तपास सुरू आहे.
बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे. याचा तपास सध्या सुरू आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button