चिखलीत पिवळ्या पाण्याविरूद्ध मनसे आक्रमक. डफडे व मटकाफोड आंदोलनाने वेधले लक्ष, पालिका प्रशासनाने मागितला १५ दिवसांचा अवधी
MH 28 News Live, चिखली : पेनटाकळी धरणात मुबलक साठा असतांनादेखील अर्धवट पाणीवाटपामुळे चिखलीकरांना पुरेसे मुबलक पाणी आजपर्यंत मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. शहरातील पाणीवाटप योजना पूर्णपणे करण्यामध्ये आजपर्यंतच्या प्रत्येक राजकारण्यासह पालिका प्रशासनाला कायमच अपयश येत असल्यामुळे चिखलीकरांची तहान भागविण्यासाठी समर्थ असलेल्या पेनटाकळी धरणातील पाणी पुरसे मिळत नाही त्यातच अस्वच्छ व पिवळे पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना याकरिता आक्रमक झाली असून पालिकासमोर आज ता. १९ रोजी शहराध्यक्ष नारायणबापु देशमुख त्यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मटकाफोड आंदोलन करीत पालिका प्रशासनाला याबाबत जाब विचारला असून पालिका प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा स्वच्छ व पुर्ववत करण्याकरिता १५ दिवसाचा अवधी मागितला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी ता. २७ फेब्रुवारी रोजी मनसेने पालिका प्रशासनाला देवून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वास्त केले हेाते. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पेनटाकळी व खडकपूर्णासारखे मोठमोठे प्रकल्प असतांनासुद्धा गेल्या १५ ते २० वर्षांपासून आजही शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी १५ ते २० दिवसांपर्यंत नळाचे पाणी मिळत नाही. जे मिळते तेसुद्धा दुषित व पिण्यायोग्य नसते. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असून अनेक नागरिकांना किडनी स्टोन, पोटाचे विविध आजारांसह इतर आजारांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. नगर प्रशासन दरवर्षी शहरातील नळधारकांकडून पाणीकराच्या रूपाने पाणीकर वसुल करते. परंतु नागरिकांना वर्षातून केवळ १० ते २० दिवसच जेमतेम पाणी पुरवठा करते. नागरिकांना काही दिवसच जेमतेम पाणीपुरवठा होत असून नळपट्टी पूर्ण वर्षभराची आकारली जात आहे. त्यामुळे साहजिकच पालिकेच्या वतीने नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि नियमितपणे तीन चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता मनसेच्या वतीने ता. 27 फेब्रुवारी रोजी नगर पालिका प्रशासनानाला निवेदन देवून त्याबाबत त्वरीत आदेश देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली होती. मात्र तरीदेखील आज ता. १९ रोजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिखलीकरांना पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता मनसे स्टाईलने पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर डफडे वाजवित मटका फोड आंदोलन करण्यात आले. यापुढे स्वच्छ व पुरेसे पाणीपुरवठा न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले.आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष नारायण देशमुख यांच्यासह संजय पैठणकर शहर उपाध्यक्ष, रवी वानखेडे शहर उपाध्यक्ष, अजय खरपास शहर सचिव, प्रविण देशमुख तालुका सचिव, समाधान म्हस्के विभाग प्रमुख, दिनकर खरपास, निशांत गायकवाड विभाग प्रमुख, संदीप म्हस्के, ज्ञानेश्वर हाडे, जितू इंगळे आदी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button