
गलथान कारभाराला कंटाळून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलेले होते कुलूप. कारवाईच्या आश्वासनानंतर ७ दिवसांनी उघडले. धोत्रा भणगोजी येथील प्रकार
MH 28 News Live : चिखली : तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथील ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्या गलथान कारभार व भ्रष्टाचाराला कंटाळून धोत्रा भणगोजी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन 20 एप्रिल 2023 कार्यालयाला ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्या दिवशी पासून आज पर्यंत ग्रामस्थांनी ठोकलेला ताला तसाच होता . तो ताला आज गटविस्तार अधिकारी राठोड यांनी पंचनामा करून व कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन कुलुप उघडले.
या बाबत सविस्तर असे की धोत्रा भणगोजी येथील सरपंच गुलाबसिंग सोनारे व सचिव कु. नयना जाधव यांचे निष्क्रिय व गलथान कारभारामुळे गावात पिण्याचे पाणी व सांडपाण्याची दुरवस्था, निकृष्ठ दर्जाचे अंगणवाडी साहित्य माघील आठ महिन्या पासून पडुन आहे,तसेच फॉग मशीन नोव्हेंबर 2022 मध्ये कागदोपत्री खरेदी केली, फॉग मशीन तसेच कागदोपत्री केलेली कामे,अपुर्ण नाली बांधकाम, नाली दुरुस्ती, ठेकेदारांची प्रलंबित बिले, 2 आर ओ प्लॅन्ट वर्षभरापासून खरेदी करूनही कार्यान्वित नाही. गावकऱ्यांचे तक्रार अर्जावर उत्तर किंवा कार्यवाही न करणे. अश्या भ्रष्ट्र व गलथान कारभारामुळे कंटाळलेल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी 20 एप्रिल 2023 रोजी कुलूप ठोकले होते, तेव्हा पासून आज पर्यंत ते कुलूप तसेच होते तेव्हा पासून ग्रामपंचायत कडे ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी ग्रामस्थांचे उग्र रूप पाहता त्या ठिकाणी आले नाही शेवटी आज पंचायत समिती कार्यालयाने मध्यस्थी करीत विस्तार अधिकारी श्री राठोड यांना धोत्रा भणगोजी येथे पाठून पंचनामा करून सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी चौकशी साठी संपूर्ण दस्त ऐवज घेऊन ग्रामसेवक यांना हजर राहण्यास सांगितले व त्यानंतर पंचनामा करून सदर ताला उघडण्यात आला.
वरील प्रकरणा नंतर धोत्रा भणगोजी ग्रामपंचायत मध्ये एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी योग्य व नियमानुसार कार्यवाही न झाल्यास आक्रमक भूमिका घेऊन पंचायत समिती विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. कुलूप उघडतांना ग्रामपंचायत सद्स्य प्रसाद काळे , गजानन देशमुख (इंगळे), प्रशांत कापसे , गणेश कुसळकर, विजय कोल्हे , संदीप उन्हाळे, संदीप म्हस्के , प्रविण देशमुख, रामकृष्ण कापसे, निखिल काळे ,शिवदास चव्हाण, अंकित इंगळे, अमोल कापसे, विशाल कापसे, समाधान गुजर यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी विवेक पवळ , अमोल निकम ,शिवदास चव्हाण , सरपंच गुलाबसींग सोनारे व सचिव कु नयना जाधव हे उपस्थित होते.