♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अडत व्यापारी गटातील अग्रवाल व खबुतरे यांना अपक्ष उमेदवार केलास शर्मा यांच्यासह विविध संघटनांचा पाठींबा. चिखली कृ. उ. बा. स. निवडणूक

MH 28 News Live, चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्याकडे पोहचत आहे. मतदानला केवळ एक दिवस शिल्लक आहे. दरम्यान अडत व्यापारी गटातील सहकार परिवर्तन पँनलच्या उमेदवारांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असून या गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे कैलास शर्मा यांनी सहकार परिवर्तन पँनलचे उमेदवार मयूर अग्रवाल आणि संतोष खबुतरे यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला याशिवाय विविध संघटनांनी देखील आपले समर्थन दोन्ही उमेदवारांना दिल्यामुळे अग्रवाल आणि खबुतरे यांचे पारडे जड झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात केली आहे. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप – शिवसेना महायुतीचे नेते गावोगावात जाऊन प्रचार बैठका घेऊ लागले आहेत. या निवडणुकीमध्ये आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात सहकार परिवर्तन पॅनल तर माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतत्वात बळीराजा पॅनल मैदानात उतरले आहे. या निवडणुकीमध्ये अडत व्यापारी मतदारसंघातून सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मयूर राजेंद्र अग्रवाल व संतोष वामनअप्पा खबुतरे हे आपले आपले नशिब आजमावत असून आतापर्यंतच्या प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे.

अग्रवाल आणि खबुतरे यांनी दिली विकासाची ग्वाही

मतदानासाठी शेवटचे तास शिल्ल्क उरले असल्याने उमेदवार डोअर टू डोअर प्रचारावर भर देत आहेत. अडत व्यापारी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मयुर राजेंद्र अग्रवाल व संतोष वामनअप्पा खबुतरे यांची प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. या दोघांनाही अडत व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांची जाणीव असल्याने अडत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास आपण कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही ते आपल्या भेटीदरम्यान मतदारांना देत आहेत. चिखली बाजार समितीच्या कारभारामध्ये परिवर्तन घडवून स्वच्छं, पारदर्शक व शेतकरी हिताचा कारभार करण्यासाठी सहकार परिवर्तन पॅनल मैदानात उतरले आहे. चिखली कृषी उत्पन्नं बाजार समिती समस्यांच्या विळख्यात अडकली असून अडत व्यापाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळयामध्ये विकत घेतलेला माल ओला होणे , वारंवार होणाऱ्या चोऱ्या , मोकाट जनावरांचा होणारा त्रास , या समस्या कायमच अडत व्यापाऱ्यांना भेडसावत आल्या आहेत. या सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडवून अडत व्यापाऱ्यांना निर्धास्तपणे आपला व्यापार करता येईल तसेच शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणल्यानंतर पिण्याचे स्वच्छं पाणी, व्यापारी यांचा साठी मार्केटची जागा ९९ वर्ष लीज वर करण्यासाठी प्रयत्न करणार, एमआईडीसीमध्ये मार्केट जाण्यास विरोध करु, मार्केटमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी, बैंकेची शाखा उपलब्ध करणार, अड़त व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यापारी भवन, गुरे बजार व भाजी मार्केटसाठी बेड कोंक्रीट व स्वतंत्र शेड, अल्पदरात जेवणाची व्यवस्था, मार्केटची आवक वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न तसेच शेतकऱ्यांसाठी सोबत आणलेली शिदोरी खाण्याकरता शिदोरी गृहाची निर्मीती देखील करण्याचे अभिवचन संतोष वामनअप्पा खबुतरे व मयूर राजेंद्र अग्रवाल देत आहेत.

अपक्ष उमेदवार व विविध संघटनांचा अग्रवाल व खबुतरे यांना पाठिंबा

विशेष म्हंणजे संतोष वामनअप्पा खबुतरे व मयुर राजेंद्र अग्रवाल यांना अपक्ष्य उमेदवार केलास शर्मा यांनी आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून भाजीपाला अडत व्यापारी, धान्यं अडत व्यापारी, गुरे ढोरे व्यापारी या संघटना यांच्याकडून मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129