♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘द केरला स्टोरी’ बद्दल दिग्दर्शकाने केला मोठा गौप्यस्फोट; काय म्हणाले सुदीप्तो सेन…?

MH 28 News Live : संपूर्ण देशात सध्या ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद बघायला मिळाला. मात्र, दुसरीकडे आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या विरोधात अनेकांनी थेट कोर्टात धाव घेतली होती. इतकेच नाही तर सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, शेवटी मोठ्या वादानंतर चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आँफिसवर धमाकेदार ओपनिंग केलीये. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द देखील करण्यात आले आहेत.

‘ द केरला स्टोरी ‘ हा चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरला स्टोरी चित्रपटाच्या जबरदस्त ओपनिंगनंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी वादावर माैन सोडत अत्यंत मोठे भाष्य केले आहे. लोकांचा प्रतिसाद चित्रपटाला मिळताना पाहून सुदीप्तो सेन यांनी काही मोठे खुलासे देखील केले आहेत.

सुदीप्तो सेन म्हणाले की, मी या विषयावर द कश्मीर फाईल्सच्या अगोदरपासून काम करायला सुरुवात केली होती. लोक माझ्या चित्रपटाबद्दल बोलत असताना कश्मीर फाईल्स चित्रपटाला का आणतात हे मला कळत नाही. तुम्ही माझ्याशी सहमत असाल की नाही मला माहिती नाही पण द कश्मीर फाईल्सने भारतातील लोकांना हादरवून सोडले. माझा चित्रपट वेगळा नक्कीच आहे. मुळात म्हणजे माझ्या चित्रपटाची स्टोरी देखील खूप वेगळी आहे.

सुदिप्तो सेन पुढे म्हणाले, मी या विषयावर तब्बल सात वर्ष अभ्यास केला. त्याचबरोबर जगभरातून शेकडो कागदपत्रे आम्ही जमा केली आहेत. द केरळ स्टोरीने ३२ हजार भारतीय महिला ISIS च्या तावडीत अडकल्या आहेत आणि त्यांना भारतातून आमिष दाखवून इराक आणि सीरियामध्ये पाठवले आहे, असेही यावेळी बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले आहेत.

मुळात म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाला रिलीजच्या अगोदर मोठा विरोध होताना दिसत होता. मात्र, आता चित्र वेगळे बघायला मिळत आहे. अनेकजण द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत असून चित्रपटाच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर देखील करत आहेत. चित्रपट धमाका करताना दिसतोय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129