
मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण लोणारमध्ये सुटले
MH 28 News Live, चिखली : पिण्याच्या पाण्यासाठी तीन दिवसापासून चाललेल्या आमरण उपोषण नगरपरिषद मुख्याधिकारी विभा वराडे यांच्या लेखी आश्वासनानंतर दि. १ जून रोजी सोडण्यात आले.
लोणार शहरात गत पाच वर्षापासून महिन्यातून एकदाच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्या कारणाने लोणार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख तथा नगरसेवक गजानन जाधव कैलाश अंभोरे, श्रीकांत मादनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते दि. २९ मे पासून आमरण उपोषणास बसले होते. लोणारमध्ये चार ठिकाणाहून पाणी आणले जाते तरी महिन्यातून एक वेळा नळाला पाणी येते त्यामुळे चौथ्या दिवशी पाणी द्यायला हवे म्हणून सदरील आमरण उपोषण सुरू होते.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे यांनी सर्व बाबतीत अभ्यास करून नरेंद्र खेडेकर आशिष रहाटे, नंदू कराळे, डॉ गोपाल बछीरे, अजय हाडोळे, सुधन अंभोरे, शाम राऊत, तानाजी मापारी, लुकुमान कुरेशी, इकबाल कुरेशी, प्रकाश सानप, सिंधुताई जाधव, रुक्मिणी अंभोरे, कल्पनाताई अंभोरे, आशाताई अंभोरे, पार्वती अंभोरे, वनमाला मोरे, संजीवनी वाघ या मान्यवरांच्या साक्षीने एक तारखेपासून दर दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.