♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्वेताताई महाले ठरल्या पहिल्या ‘सिक्स सिग्मा, वर्षातील सर्वोत्कृष्ट आमदार’. १६ मार्चला होणार दिल्लीत सन्मान !

MH 28 News Live, चिखली : दिल्ली येथील सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डसच्या वतीने उत्तम कामगिरीसाठी दिला जाणारा ‘ सर्वोत्कृष्ट आमदार – २०२२ ‘ हा पुरस्कार चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांना घोषित झाला आहे. दिल्ली येथे १६ मार्चला या पुरस्काराचे वितरण एका भव्य कार्यक्रमात होत आहे.

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून यासंबंधीचे पत्र आ. श्वेताताई महाले यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १६ मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे होणार आहे.

 

अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण आणि सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने आ. श्वेताताई महाले यांच्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला आहे.

 

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डस अँड लीडरशिप समिट २०२२ चे आयोजक अध्यक्ष डाॅ. प्रदीप भारद्वाज यांनी हे पत्र पाठवले असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

 

या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, दिल्लीचे आरोग्यमंत्री, माजी लष्करप्रमुख, तीन परमवीर चक्र विजेते हे सन्माननीय अतिथी असतील. या सोहळ्याचे वार्तांकन प्रमुख टीव्ही वाहिन्या व वृत्तपत्रांकडून केले जाईल.

हा तर नागरिकांचा सन्मान – आ. श्वेताताई महाले

 

“हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते” अशी प्रतिक्रिया आमदार श्वेताताई महाले यांनी MH 28 News Live शी बोलताना दिली. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129