♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या बांधकामास रेती उपलब्ध करुन द्या – रवींद्र डाळीमकर यांची मागणी

MH 28 News Live, अमडापूर : चिखली तालुक्यातील मौजे कव्हळा – सावरखेड नजीक येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासकीय घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र डाळीमकर यांनी दि. १५ जून रोजी शासनाकडे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या मार्फत निवेदन देऊन केली.

कव्हळा, सावरखेड नजीक येथील 19 घरकुलच्या लाभार्थ्यांची बांधकामे सन २०२३-२४ या वर्षामध्ये मंजुर झाली, त्यांनी घरकुलाची कामे सुरु केलेली असुन ती रेती अभावी अर्धवट स्थितीत आहेत. सध्या पावसाळयाचे दिवस असुन त्यांना पक्के घर नसल्यामुळे घराचे काम अर्धवट आहे, ते उघडयावर पाल करुन राहत असल्यामुळे मागील एक महिन्यापासून रेती आभावी घरांची कामे अर्धवट झालेली आहेत. तरी त्यांना शासनाने ठरविलेल्या नवीन रेती धोरणानुसार, रेती उपलब्ध करुन देण्यात यावी जेणेकरुन त्यांच्या घराची अर्धवट राहीलेली कामे लवकरात लवकर पुर्ण होतील व पावसामुळे होणारे त्यांचे व कुटुंबाची वाताहात होणार नाही.
तरी त्यांना शासनस्तरावरुन शासनाच्या नवीन रेती धोरणानुसार रेती उपलब्ध करुन दिल्यास त्यांना हक्काची घरे मिळतील तसेच सदर बांधकामासाठी रेती उपलब्ध न झाल्यास त्यांनी कुंटुबासमवेत तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर सरपंच रवींद्र डाळीमकर यांच्यासह भास्कर कासारे, राजू इंगळे, राजू आव्हाड, विठ्ठल सहाने, वामन खडसे, भगवान तोड़े, शिवाजी खडसे, संजय खंडारे, रघुनाथ खंडारे, संजय गायकवाड, दिलीप खंडारे, भारत डाळीमकर, गोदावरी खंडारे, विश्वनाथ खंडारे, अशोक सुरसे, नामदेव कौसे, भानुदास पालखे, संजय सोळंकी, अशोक वतपाळ
आदीच्या सह्या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129