
अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना शिक्षा करून कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या – संजय वाकोडे
MH 28 News Live, चिखली : नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शासन करण्यात यावे व मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या संदर्भात दि. १९ जून रोजी वाकोडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये अक्षय वाकोडे यांची झालेली हत्या ही निषेधार्ह असून ही जातिवादी प्रवृत्तीचे द्योतक असल्याचे म्हटले आहे. समाजातील उच्चवर्णीय लोक अजूनही दलित वर्गावर अत्याचार करत असून असे अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली असून सोबतच मयत अशोक भालेराव यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य शासनाने करावी असे देखील मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. या निवेदनावर संजय वाकोडे यांच्यासह विलासराव गवई, विनोद खंडाळकर, शेख इब्राहिम आणि भीमराव आराख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button