
दलित समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचितचे लोणारमध्ये निषेध आंदोलन
MH 28 News Live, लोणार : वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याचे वतीने तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन दि. २१ जून रोजी महेंद्र पनाड यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.
तालुक्यातील वंचितचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जमून त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. नांदेड जिल्ह्यातील बोंढार हावेली येथील बौद्ध तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढण्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे जातीय द्वेषातून गाव गुंडांनी निर्घृण हत्या केली त्याचप्रमाणे मुंबई येथील सावित्रीमाई फुले वस्तीगृहात कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेली बौद्ध तरुणी नेहा मेश्राम हीच्यावर नराधमानी अत्याचार करून तिचा खून केला. लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथील मातंग समाजातील तरुण तापघाले याची देखील ” तू चांगला का राहतो ” असे म्हणून जातीय द्वेषातून निर्घृण हत्या केली त्याचप्रमाणे आय आर एस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असल्यामुळे जातीय द्वेशातून सीबीआयने एफ आय आर दाखल करून त्यांना मनस्ताप दिला व काही कारण नसताना कारवाईचा बडगा उगारला.
ह्या सर्व घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत या सर्व गोष्टींचा वंचितच्या वतीने लोणार येथील तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करून घ्या, नेहा मेश्राम हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे, गिरीधर तापघले ह्या तरुणाचे कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे, वरिष्ठ बौद्ध अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हेतू पुरस्सर केलेल्या कार्यवाहीची चौकशी झाली पाहिजे आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांना देण्यात आले. तालुका अध्यक्ष दिलीप राठोड यांच्या नेतृत्वात पार पडलेले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी बळी मोरे, मालती ताई कळंबे ,आणि गौतम गवई यांनी परिश्रम घेतले तर या आंदोलनाचे दमदार सूत्रसंचालन प्रवीण जावळे यांनी केले. यावेळी परिसरातील असंख्य वंचितच्या कार्यकर्त्यांसह राहुल पनाड माजी सरपंच सुलतानपूर, प्रफुल इंगळे उपसरपंच चोरपांगरा, प्रवीण मोरे उपसरपंच गायखेड, प्रा. शिवप्रसाद वाठोरे, पांडुरंग सुरूशे, प्रवीण अवसरमोल, अभिमान मोरे अशोक लहाने, ऍड अशोक अवसरमोल, अँड बी. आर. अंभोरे, संजय लहाने, शंकर मुळे संदीप गवई, महादा घुले, राजेश पनाड, राजू पेंटर, रुख्मिना मोरे, सुरेश मोरे, पवन अवसरमोल, देवानंद नरवाडे, मोहन वानखेडे, गजानन पगारे, महेंद्र मोरे, प्रशिक इंगळे, रामभाऊ मोरे, सुनील इंगळे, जगन गवई भीमराव वाठोरे, सुनील पाडमुख आदिंसह मोठ्या प्रमाणात वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते हजर होते.