♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महार रेजिमेंटच्या वर्धापन महोत्सवाने जागवला जाज्वल्य शौर्याचा इतिहास

MH 28 News Live  चिखली : माजी सैनिकांची बिना परिश्रम यश कहा या सैनिकी संघटनेचा वर्धापनदिन रविवार दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी चिखली येथील राजवाडा रिसॉर्ट मेहकर फाटा चिखली येथे उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभेदार मेजर सुरेश तेलंग,उद्घाटक मेजर यादव म्हस्के, कॅप्टन वालचंद परमेशोर, कॅ.रामदास लहाने, रमेश अवसरमोल, भिमराव वानखेडे, गुलाब पानझडे, अशोक पवार, विजय जाधव, ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, नंदु ढाकरके, गौतम सावळे, संजय खंडारे, शेषराव चव्हान, काशिनाथ इंगळे, दत्ता गवई, सतिश पवार आदि उपस्थीत होते.

या वेळी इतिहास अभ्यासक राजेश साळवे म्हणाले की ‘महार रेजिमेंट’ देशातली अशी एकमेव रेजिमेंट आहे, ज्यामध्ये देशातल्या सगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समुदायातील सैनिकांचा समावेश आहे. रेजिमेंटचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, परंतु भारतीय सेनेमध्ये या रेजिमेंटचा समावेश १ ऑक्टोबर १९४१ रोजी करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य झाल्यानंतर या रेजिमेंटच्या भारतीय सैन्यातील समावेशासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

सतिश पवार म्हणाले की महार रेजिमेंटचा जाज्वल्य गौरवशाली इतिहास आहे.अनेक या रेजिमेंटने अनेक युद्धांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदविला व अनेक विक्रम घडविले,परंतु सैनिक देशसेवा करून सेवानिवृत्त होऊन आल्यानंतर समाज मात्र त्यांना सामाजिक, राजकिय प्रवाहात पाहिजे तेव्हढ्या प्रमाणत सामील करुन घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे.म्हणुन मेजर लक्ष्मण साळवे हे संघटनेच्या माध्यमातून सैनिकांच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत,त्यांच्या प्रत्येक कार्यात आम्ही होईल ती मदत करु अशी ग्वाही दिली. तर मेजर लक्ष्मण साळवे यांनी आणि माजी सैनिकांची पाहिली पतसंस्था लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करुण, चिखली तालुकयातील शहीद स्मारकपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली,१९६२, १९६५, १९७१, १९९९ च्या युद्धात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला असे विर जवान, शहीद वीर पत्नी, वीर माता यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेजर लक्ष्मण साळवे यांनी केले, आभार प्रदर्शन मेजर रमेश साळवे यांनी केले, यशस्वीतेसाठी राजु वानखेडे, गणेश जाधव, प्रकाश मिसळकर, पंडित जाधव, राहुल जाधव, जय शिरसाठ सुनिल साबळे, रमेश ओव्हाळे, अर्जून साबळे, सीताराम मोरे, अशोक बोरकर, विठ्ठल गवई आदींनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129