♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भारतमाला परियोजना देणार महाराष्ट्राला नवीन आंतरराज्यीय महामार्ग; २०० किलोमीटरने घटणार या’ दोन शहरांमधील अंतर

MH 28 News Live : केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्त्यांची उभारणी केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. देशातील महत्त्वाची शहरे एकमेकांना जोडण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी भारतमाला परियोजना देखील राबवली जात आहे.

या भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील अनेक महत्त्वाच्या महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये मुंबई-दिल्ली महामार्गाचा देखील समावेश आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी तसेच देशाचे आर्थिक राजधानी मुंबई ही दोन्ही कॅपिटल शहरे रस्ते मार्गाने थेट जोडण्यासाठी या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे.

हा महामार्ग एकूण 1386 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर 200 किलोमीटरने कमी होणार आहे. साहजिकच, यामुळे प्रवासाच्या वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. NHI सांगितल्याप्रमाणे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त 12 तासात पूर्ण होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने दिल्ली अब दूर नही असं म्हणावं लागणार आहे. या महामार्गामुळे फक्त दिल्ली आणि मुंबई शहर एकमेकांना जोडले जाणार आहेत असे नाही तर दिल्ली, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्य देखील यामुळे परस्परांना कनेक्ट होणार आहेत.

परिणामी देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत होणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला देखील चालना मिळणार आहे. यामुळे हा महामार्ग केव्हा तयार होणार हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे.

केव्हा तयार होणार मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे ?

हा महामार्ग येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये पूर्णपणे बांधून तयार केला जाणार आहे. खरंतर, आगामी वर्षात लोकसभा आणि देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सूरु होणार आहे. यामुळे हा एक लाख कोटी रुपये खर्चाचा महामार्ग पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत किती काम झाले आहे ?

सध्या स्थितीला मुंबई ते दिल्ली हा महामार्ग अंशता खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग फेब्रुवारी 2023 मध्ये अंशता सुरू करण्यात आला आहे. एकूण 1386 किलोमीटर लांबीचा या मार्गाचा पहिला टप्पा म्हणजे सोहना-दोसा-लालसोटचा टप्पा 12 फेब्रुवारी 2023 ला सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे. पहिला टप्पा एकूण 246 किलोमीटर लांबीचा आहे.

यासाठी १२,१२० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते राजस्थान मधील जयपूर हा प्रवास केवळ साडेतीन तासात पूर्ण होत आहे. यामुळे दिल्ली ते राजस्थान हा प्रवास गतिमान झाला आहे. याआधी दिल्ली ते जयपूर हा प्रवास करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागत होता मात्र या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे आता प्रवासाचा हा कालावधी दीड तासांनी कमी झाला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129