
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची लवकर पूर्तता करणार – अजितदादा पवार आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात रेल्वे लोकआंदोलन समितीची उपमुख्यमंत्र्यांशी भेट
चिखली : दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन 50 टक्के सहभाग देईल असे अशी घोषणा केली होती. या संदर्भात आ, श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी दि. २९ फेब्रुवारी रोजी विधिमंडळात उपमुख्यमंत्र्यांच्या कक्षात अजितदादा पवार यांची भेट घेतली व अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची त्वरित पूर्तता करण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी खामगाव – जालना रेल्वेमार्गाबद्दल केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश अर्थ खात्याला दिले आहेत तसेच आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५० टक्के निधी देण्याचा ठराव देखील मंजूर होईल अशी ग्वाही दिली.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दि. २७ ▪️ फेब्रुवारी रोजी विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के सहभाग येईल अशी घोषणा केली होती. या घोषणेची त्वरित पूर्तता व्हावी यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेतला व रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य डॉ. किशोर वळसे, रेणुकादास मुळे व संतोष लोखंडे यांना मुंबई येथे बोलावून घेतले. त्यानुसार आज दि. २९ फेब्रुवारी रोजी आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विधिमंडळातील दालनात भेट घेतली. आ. श्वेताताई महाले यांनी रेल्वे लोकआंदोलन समितीने खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी केलेल्या उपोषणाची माहिती देत राज्य शासनाने या संदर्भात अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेबद्दल अजितदादा पवार यांचे आभार मानले व लवकरात लवकर या घोषणेची पूर्तता करावी अशी विनंती केली.
केलेल्या घोषणेची ज्ञ पूर्तता मंत्रिमंडळ बैठकीत करणार – अजितदादा पवार
खामगाव – जालना रेल्वेमार्गाबाबत अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेबद्दल राज्य सरकार गंभीर आहे; लवकरच या संदर्भातला ठराव मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत घेण्यात येईल व ५० टक्के राज्य हिस्सा या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार मंजूर करेल, तसे पत्र केंद्रीय रेल्वे बोर्डाला सुद्धा पाठवले जाईल व शासन आदेश निघेल अशी ठोस वही अजितदादा पवार यांनी आ. श्वेताताई महाले व रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांशी बोलताना दिली. आ. महाले यांनी सातत्याने हा मुद्दा लाऊन धरत खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा विषय राज्य सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला असा अभिप्राय देखील अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला, तर यापुढे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी कसलेही अडचण असल्यास आल्यास उपोषण न करता थेट आम्हाला भेटायला आमची भेट घेऊन समस्या सांगा लगेच सोडवली जाईल असे देखील अजितदादा पवार म्हणाले, यावेळी लगोलग त्यांनी अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून खामगाव जालना रेल्वे मार्ग बाबत अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची मान्यता मंत्रिमंडळ तातडीने घेण्याचे निर्देश दिले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button