♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिवाजी महाराजांची एके काळी राजधानी असलेल्या राजगडावर अमोल साठेंनी पद्मावती देवीची केली पूजा, मागितला श्वेताताईंसाठी आशीर्वाद

MH 28 News Live, चिखली : रायगडच्या आधी छत्रपती Shivaji Maharaj  यांनी राजधानी  म्हणून पुणे जिल्ह्यातल्या Rajgad ची निवड केली होती. राजगडावर त्याचं थोडी थोडकी नाही तर २५ वर्ष वास्तव्य होतं असं म्हटलं जातं. एवढाच नव्हे तर मुघलांशी केलेल्या तहात सुद्धा महाराजांनी राजगड आपल्याकडेच ठेवला होता. हिंदवी स्वराज्यात असे महत्त्वाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक अशा राजगडावर भाजपा वैरागड येथील माजी सरपंच अमोल साठे यांनी तेथील देवी Padmavati चे दि. ३० नोव्हेंबर रोजी दर्शन घेतले व भगवतीची यथा सांग पूजा करून आ. श्वेताताई महाले यांच्यासाठी देवीला आशीर्वाद मागितला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले श्री राजगड… महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बहुतांशी घटना याच किल्ल्यावर घडल्या.महाराज या किल्यावर जवळपास २५ वर्षे राहिले… इथल्या देवी आई पद्मावतीने राजांची प्रत्येक मागणी पुरविली.. स्वराज्याची न्यायदेवता ते रयतेच्या नवसाला पावणारी देवी हीच…याच मंदिरात जिजाऊ माँ साहेबांनी औरंग्याच्या तावडीत छत्रपती सापडले तेव्हा सुटकेसाठी अखंड नंदादीप तेवत ठेवलेला… मराठ्यांचे मनोरथ या मायेने नेहमी पुरवली…आमचाही खणा नारळाने ओटी भरण्याचा मनोमन तिच्या पायाशी केलेला नवस पूर्ण केला.. तिच्या आशीर्वादानेच आमची हक्काची बहीण श्वेताताई महाले आमदार म्हणून निवडून आली… असेच आशीर्वाद सर्वांच्या कायम पाठीशी ठेव असं तिच्या पायाशी मागणं मागितलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अचलपूरचे धारकरी निलेश टापरे हे होते.

हल्लीच्या राजकारणामध्ये श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी निष्ठावनांकडेच आढळून येतात. खरं म्हणजे कोणताही नेता निवडणूक लढवत असतो परंतु खरी लढाई ही बूथ वरच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचीच असते. आमदार श्वेताताई महाले यांचा देखील ईश्वरीय मातृशक्तीवर प्रकार श्रद्धा असून दर निवडणुकीच्या काळात प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळत त्या विजयासाठी आशीर्वाद मागताना दिसतात पण निकालाच्या दिवशी मात्र त्या मातृशक्ती असलेल्या शक्तिपीठांवर सकाळपासूनच आराधना करीत असतात ही दोन निवडणुकांमध्ये आढळलेली विशेष बाब म्हणावी लागेल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129