♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रोजगार वार्ता – आरसीएफ’मध्ये ३७८ पदांची ‘अॅप्रेंटिस’ भरती

MH 28 News Live : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) (भारत सरकारचा उपक्रम). आपल्या थळ, रायगड व ट्रॉम्बे, मुंबईमधील ऑपरेटिंग युनिटमध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण ३७८ ग्रॅज्युएट/टेक्निशियन/ट्रेड अॅप्रेंटिसेस ट्रेनी पदांची भरती.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) (भारत सरकारचा उपक्रम). आपल्या थळ, रायगड व ट्रॉम्बे, मुंबईमधील ऑपरेटिंग युनिटमध्ये अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण ३७८ ग्रॅज्युएट/टेक्निशियन/ट्रेड अॅप्रेंटिसेस ट्रेनी पदांची भरती.

(ए) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदे – एकूण १८२ पदे. अॅप्रेंटिसशिप कालावधी – १२ महिने. स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.

(१) अकाऊंट्स एक्झिक्युटिव्ह – ५१ पदे (ट्रॉम्बे युनिट – २६, थळ युनिट – २५).

पात्रता : B. Com., BBA/इकॉनॉमिक्स विषयासह पदवी. (इंग्लिश भाषेचे आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक.)

(२) सेक्रेटरिअल असिस्टंट – ९६ पदे (ट्रॉम्बे युनिट – ६६, थळ युनिट – ३०).

पात्रता : (कोणतीही शाखा) पदवी उत्तीर्ण. (इंग्रजी भाषेचे आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक) प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

(३) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह (एचआर) – ३५ पदे (ट्रॉम्बे युनिट – २०, थळ युनिट – १५).

पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) (इंग्रजी भाषा आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक).

(बी) टेक्निशियन अॅप्रेंटिसेस – एकूण ५४ पदे. प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.

(१) डिप्लोमा केमिकल – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(२) डिप्लोमा कॉम्प्युटर – ६ पदे (ट्रॉम्बे – ३, थळ – ३).

(३) डिप्लोमा इलेक्ट्रिकल – १० पदे (ट्रॉम्बे – ५, थळ – ५).

(४) डिप्लोमा इन्स्ट्रूमेंटेशन – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(५) डिप्लोमा मेकॅनिकल – २० पदे (ट्रॉम्बे – १०, थळ – १०).

(६) डिप्लोमा सिव्हील – १४ पदे (ट्रॉम्बे – ९, थळ – ५).

पात्रता : पद क्र. (बी) १ ते ६ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग पदविका उत्तीर्ण.

(सी) ट्रेड अॅप्रेंटिसेस – एकूण ८० पदे. स्टायपेंड – दरमहा रु. ७,०००/-.

(१) अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) – ७४ पदे (ट्रॉम्बे – ३३, थळ – ४१). प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.

(२) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – ८ पदे. प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

पद क्र. १ व २ साठी पात्रता : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) B.Sc. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (केमिस्ट्री मुख्य विषयांसह उत्तीर्ण).

(३) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) – ३ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – १). प्रशिक्षण कालावधी – १२ महिने.

पात्रता : B. Sc. (PCM) (फिजिक्स मुख्य विषयासह उत्तीर्ण).

(४) बॉयलर अटेंडंट – ३ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – १). कालावधी – २४ महिने.

(५) इलेक्ट्रिशियन – ४ पदे (ट्रॉम्बे – २, थळ – २). कालावधी – २४ महिने.

(६) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – २ पदे (ट्रॉम्बे – ०, थळ – २). कालावधी – १५ महिने.

पद क्र. ४ ते ६ साठी पात्रता : १२ वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण.

(७) हॉर्टिकल्चर असिस्टंट – ६ पदे (ट्रॉम्बे – ३, थळ – ३).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण. प्रशिक्षण कालावधी – २४ महिने.

पद क्र. २ व ४ साठी प्रशिक्षण कालावधी – २ वर्षं.

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा किमान सरासरी ५०ङ्घ गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी किंवा शेवटच्या दोन सेमिस्टर्सच्या गुणांची टक्केवारी) (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना किमान ४५ङ्घ गुण आवश्यक)

कॅटेगरी निहाय रिक्त पदांचा तपशिल – एकूण ३७८ पदे (अजा – ५६, अज – २८, इमाव – १०१, ईडब्ल्यूएस् – ३७, खुला – १५६)

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा दि. १ जानेवारी २०२२ किंवा त्यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीतून योग्य ठरलेल्या उमेदवारांना अॅप्रेंटिस ट्रेनी पदावर नेमणूक दिली जाईल, त्यांना १ आठवड्याचा कालावधी जॉईन करण्यासाठी देण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या पूर्वी निवडलेले उमेदवार जॉईन झाले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी बनविली जाईल. CGPA/ CPI किंवा इतर ग्रेड्सचे परसेंटेजमध्ये रूपांतर करण्याचे संबंधित युनिव्हर्सिटी/इन्स्टिट्यूशनकडील सर्टिफिकेट रिपोर्टींगच्यावेळी सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी – ट्रेड अॅप्रेंटिसेस पदांसाठी https:// apprenticeshipindia. gov. in; टेक्निशिअन अॅप्रेंटिसेस/ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस पदांसाठी www. nats. education. gov. in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. rcfltd. com या संकेतस्थळावर दि. २४ डिसेंबर २०२४ (संध्या. ५.०० वाजे)पर्यंत करावेत.

अर्जासोबत (फोटोग्राफ व सही वगळता) इतर कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाची नाहीत.

शंकासमाधानासाठी apprentice2024 @rcfltd. com या ई-मेलवर संपर्क साधा.

निवड झालेल्या उमेदवारांना सादर करावयाची मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकीत प्रती यांची यादी RCFL च्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पान क्र. ८ वरील IMPORTANT INSTRUCTIONS मध्ये दिलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129