लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांमुळे सरोवराच्या अस्तित्वला धोका
MH 28 News Live : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध (Lonar Sarovar) लोणार सरोवराच्या काठावरून जाणारे दोन महामार्गांवरून होणारी अवजड वाहतूक यामुळे सरोवराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. लोणार सरोवराच्या काठावरून पूर्वेच्या दिशेने शेगाव पंढरपूर महामार्ग तर उत्तरेकडून वाशिम जालना महामार्ग जातो. या दोन्ही महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक सुरू असल्याने या अवजड वाहतुकीमुळे व कंपनामुळे लोणार सरोवराच्या काठांना कंपने बसतात व त्यामुळे मोठे भूसखलन झाल्याचं समोर आलं आहे आणि यामुळे मात्र लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
दोन राष्ट्रीय महामार्गावरून सततच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे लोणार सरोवर परिणाम होत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या सततच्या अवजड वाहनांमुळे कंपने निर्माण होतात व त्यामुळे माती भुसभुशीत होऊन भूस्खलन होत आहे. लोणार सरोवराच्या काठावर सतत होत असलेल्या वृक्षतोडीमुळे मातीची झीज होऊन भूस्खलन होत आहे.
लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या महामार्गांचे सतत विकास कामे होत असतात आणि त्यामुळे माती भुसभुशीत होऊन भूस्खलन होत आहे. सतत भुसखलन झाला तर लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात येईल.
महामार्गांना वळण रस्ता करावा
अलीकडेच जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांमुळे लोणार अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही नुकसान होत आहे. तर दुसरीकडे या महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे व त्या वाहनांच्या कंपनामुळे लोणार सरोवराच्या कडा ढासळत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे तात्काळ सरकारने लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या महामार्गांना वळण रस्ता करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button