बिबी येथे कडकडीत बंद… संतोष देशमुख यांच्या हत्येचा झाला तीव्र निषेध
MH 28 News Live, बिबी ( शिलवंत इंगळे ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख. यांच्या निर्घृणहत्ते प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजी बीबी येथे. समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने काल बीबी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन. बंदचे आव्हान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दि. २९ डिसेंबर रोजी अत्यावश्यक सेवा सोडून, सर्व खाजगी दुकाने, प्रतिष्ठाने, बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी. ” अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे “, “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे ” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अमोल पालकर, संतोष बनकर, अमोल बनकर, केशव डहाळके, शिवप्रसाद बनकर, आकाश बनकर, शिवाजी बुरुकुल, अनिल मुळे, महादेव डुकरे, प्रदीप बनकर, गणेश तनपुरे, स्वप्निल बनकर, ऋषी दंदाले, रमेश खंडागळे, भागवत आटोळे, रामप्रसाद जाधव, लक्ष्मण नरवाडे, योगेश डुकरे, शाहीर चव्हाण, यांच्यासह समस्त मराठा बांधव हजर होते. यावेळी कडकडीत बंद असल्याने, बीबी पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button