
मागच्या चौकात पोलिसांनी शिट्टी वाजवली तुम्ही गाडी का थांबवली नाही… चिखलीत भामटय़ांनी घातला त्याला भर दिवसा सव्वातीन लाखाचा गंडा
MH 28 News Live / चिखली : अधिक माहितीनुसार कोनड बु येथील सुरेश रामराव परिहार (६०) हे दुचाकीने चिखलीवरून कोनड गावाकडे निघाले होते. त्यावेळी राम फोर्स च्या जवळ पाठीमागून एका दुचाकीवर दोघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. मागच्या चौकात पोलिसांनी शिट्टी वाजवली तुम्ही गाडी का थांबवली नाही अशी विचारणा दुचाकीवरील दोघांनी केली. त्यावेळी मला शिट्टीचा आवाज आला नाही असे सुरेश परिहार यांनी सांगितले. त्याचवेळी तुम्ही हातात अंगठ्या घालून कुठे जात आहात, अंगठ्या काढून घ्या असे दुचाकी वरील दोघांनी सुरेश परिहार यांना सांगितले. सुरेश परिहार अंगठ्या काढून घेत असतानाच दुचाकी वरील एकाने रामपुरी चाकू सुरेश परिहार यांच्या गळ्याला लावला व काही कळण्याच्या आतच गळ्यातील सोन्याचा गोफ व हातातील दोन अंगठ्या असा जवळपास सव्वातीन लाखांचा ऐवज लुटून दुचाकीस्वार विना नंबर प्लेटच्या दुचाकीने फरार झाले… या प्रकारानंतर सुरेश परिहार यांनी घडलेली हकीकत चिखली पोलीस ठाण्यात जाऊन कथन केली.. पोलिसांनी
अपराध क्रमांक 2025 अन्वये गुन्हा नोंद केला असून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता २ अन्वये कलम ३१९ (२) ३१८ (४) २०४ 3(५ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे