
पाकिस्तानात खासदार असलेला ‘ तो ‘ भारतात २५ वर्षापासून भारतात विकतोय कुल्फी
MH 28 News Live : पाकिस्तान मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचा १९८८ च्या निवडणुकीत निवडून आलेला खासदार डबाया राम हा व्यक्ती भारतात मागील २५ वर्षांपासून कुल्फी विकतो आहे. पाकिस्तान मध्ये आपल्याला स्थानिक बहुसंख्य का करून अतोनात त्रास होत असल्यामुळे तो देश सोडावा लागला. सध्या देखील पाकिस्तानात आपली २५ एकर जमीन असल्याचे डबाया राम सांगतात याशिवाय त्यांच्या कुटुंबात एकूण ३४ व्यक्ती असून त्यापैकी सहा जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. दाबायाराम व उर्वरित लोकांना मात्र अद्याप भारताचे नागरिकत्व मिळाले नाही नसले तरी लॉंग टाईम व्हिसा घेऊन ते भारतात राहत आहेत.
ते पाकिस्तानात असताना त्यांचे नाव देशराज असे होते. मात्र भारतात आल्यानंतर स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांचे नाव दबाया राम असे झाल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर डबाया राम यांचीही कहाणी समोर आली आहे प्रशासनाने त्यांचा व्हिसा पाच वर्षासाठी वाढवून देण्याची विनंती मान्य केली असून सध्या डबाया आराम हे भारतातच राहत आहेत. याबद्दल आणखी सविस्तर माहिती द्यावी.