♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खळबळजनक… खामगावात रेल्वे रुळावर २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह ! आत्महत्या की घातपात ? नातेवाईकांचे गंभीर आरोप

M H 28 News Live / खामगाव : खामगाव शहर हादरून टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागे आत्महत्या आहे की घातपात ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे. नातेवाईकांनी स्पष्टपणे घातपाताचा आरोप केला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृत युवकाचे नाव ओम विठ्ठल गिर्हे (वय २१) असे असून तो मूळचा मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवासी होता. सध्या तो खामगावमधील अमृतनगर परिसरात भाड्याने राहून फिटर ट्रेडचे प्रशिक्षण घेत होता. शनिवारी रात्री त्याने कुटुंबीयांशी फोनवर बोलणे केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह खामगाव-जळंब रेल्वे मार्गावर आढळून आला.

विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ आढळलेला मोबाईल आणि घड्याळ दगडाने फोडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, ज्यामुळे त्यांच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. ही घटना अपघात नसून सुचवून घडवलेली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे खामगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, युवकाच्या मृत्यूमागील नेमका रहस्यदाट पर्दाफाश होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129