
चैतन्य गुरुकुलच्या निकालात चैतन्यदायी भरारी: 34 विद्यार्थ्यांचे 90% पेक्षा अधिक गुण
MH 28 News Live / चिखली : येथील चैतन्य गुरुकुल शाळेने दहावीच्या निकालात यंदाही आपल्या गुणवत्तेची परंपरा अभिमानाने जपली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात शाळेने शंभर टक्के निकालाची उज्वल कामगिरी नोंदवली असून, 55 पैकी तब्बल 34 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून यशाची नवी शिखरे गाठली आहेत.
या निकालात कु. उत्कर्षा केंधळे व यश शेळके यांनी 95.20% गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. कु. अनुजा मुरकुटे 95% गुणांसह द्वितीय तर विवेक वाघ 94.80% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण मिळवले असून एकही विद्यार्थी कमी गुणवत्तेने उत्तीर्ण झालेला नाही.
ही घवघवीत कामगिरी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे मत शाळेचे संचालक आशुतोष चौधरी सर यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशीच गुणवत्ता कायम ठेवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलआह चैतन्य गुरुकुलचा हा निकाल विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून चिखली परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात शाळेचे योगदान अधोरेखित करणारा ठरला आहे.