♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पाऊस पडला, जलसाठा वाढला, तरीही जिल्ह्यात पाणीटंचाई कायम

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील ३ मोठे, ७ मध्यम, ३७ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये मिळून १५ जून २००५ रोजी जलसाठा २२.१३ टक्के इतका होता. तुलनात्मकदृष्ट्या, मागील वर्षी याच दिवशी ही टक्केवारी १५.३२८ होती. त्यामुळे यंदा जलसाठ्यात काहीशी वाढ दिसून येते.

१०० टक्के भरले तरीही पाण्याचा तुटवडा

२०२४ च्या पावसाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे बहुतांश प्रकल्प भरले गेले होते. त्यामुळे प्रशासनाला वाटले होते की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र एप्रिलपासून अनेक प्रकल्पांतील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले. परिणामी, जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

मे महिन्यात २५ हून अधिक गावांना टँकरचे पाणी

मे महिन्याच्या सुरुवातीपासून २५ पेक्षा अधिक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ही संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून सिंचन व पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडले जात असल्याने जलपातळी अधिकच घटते आहे.

उन्हाचा प्रकोप व बाष्पीभवनामुळे जलपातळीत घट

यंदा मार्चअखेरपासून उन्हाचा तीव्र प्रकोप सुरू झाल्यामुळे प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होते आहे. त्यामुळे जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील विहिरी व हातपंपांमध्येही दिसून येते.

मान्सून उशीरा आला, तर संकट वाढणार

मान्सून लांबला तर अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.

पाण्याची किंमत समजली, पण सर्वत्र नाही

ज्या गावात पाणीटंचाई आहे, तेथील नागरिक पाण्याचे महत्त्व ओळखत आहेत. मात्र ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे, तेथे नागरिक अजूनही पाण्याचा अपव्यय करतात. त्यामुळे अशा गावांमध्ये पाण्याच्या जपणुकीसाठी जनजागृती आवश्यक आहे.

प्रकल्पांतील सध्याची जलसाठा टक्केवारी

बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये सध्या खालीलप्रमाणे जलसाठा आहे:

नळगंगा – २९.८४ दलघमी

खडकपूर्णा – शून्य

पेनटाकळी – १९.४९ दलघमी

ज्ञानगंगा – १७.८६ दलघमी

मस – ४२.०० दलघमी

कोराडी – १४.९० दलघमी

पलळक – ०.७० दलघमी

मन – ९.४३ दलघमी

तोरणा – ०.४९ दलघमी

उतावळी – ३.५४ दलघमी

पाण्याविना ओस पडलेले प्रकल्प
खडकपूर्णा, हिरवड, गुंधा, तांदूळवाडी बयाळ, देवखेड, दुसरबीड या लघु प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून पाण्याचा वापर शक्य नाही.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129